मधुमेहाचा शरीरातील 'या' 4 महत्त्वाच्या अवयवांवर होतो घातक परिणाम!

Aarti Badade

रक्तातील साखरेचा शरीरावर हल्ला

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सतत जास्त राहते, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना आणि महत्त्वाच्या अवयवांना बसतो.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

हृदय आणि रक्तवाहिन्या

मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, परिणामी मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत मधुमेही रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका दुप्पट असतो.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

मूत्रपिंड (Kidneys)

किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे शरीरातील कचरा गाळण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे भविष्यात 'किडनी फेल्युअर'चा गंभीर धोका निर्माण होतो.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

डोळे आणि दृष्टी (Eyes)

रक्तातील साखर वाढल्याने डोळ्यांच्या पडद्यातील (Retina) रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, यामुळे दृष्टी कमी होणे किंवा कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

नसा आणि मज्जासंस्था (Nerves)

मधुमेहाचा परिणाम नसांवर होतो, ज्यामुळे प्रामुख्याने हाता-पायांना मुंग्या येणे, बधीरपणा किंवा असह्य वेदना जाणवू लागतात.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

पायांच्या जखमांकडे दुर्लक्ष नको!

रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे पायाला झालेली साधी जखमही लवकर भरून येत नाही, ज्यामुळे संसर्ग किंवा 'गँग्रीन' होऊन पाय कापण्याची वेळ येऊ शकते.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

नियंत्रण हाच उत्तम बचाव!

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि रक्तातील साखरेची वेळेवर तपासणी करून तुम्ही या अवयवांचे होणारे नुकसान टाळू शकता किंवा लांबणीवर टाकू शकता.

Diabetes Affects Body organs

|

Sakal

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका कोणाला आहे जास्त? फॉलो करा ‘हे’ उपाय

Kidney stone in summer

|

Sakal

येथे क्लिक करा