उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका कोणाला आहे जास्त? फॉलो करा ‘हे’ उपाय

Aarti Badade

उन्हाळा आणि किडनीचे आरोग्य

कडक उन्हात केवळ घाम आणि थकवाच नाही, तर शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे 'किडनी स्टोन'ची गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकते.

Kidney stone in summer

|

Sakal

स्टोन होण्याचे मुख्य कारण

वाढत्या तापमानामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. अशावेळी पाणी कमी प्यायल्यास लघवी घट्ट होते आणि त्यात खडे (Stone) तयार होऊ लागतात.

Kidney stone in summer

|

Sakal

शरीरात नेमके काय घडते?

शरीरात पाणी कमी असल्यास लघवीमध्ये कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. हेच घटक एकत्र येऊन हळूहळू खड्याचे रूप घेतात.

Kidney stone in summer

|

Sakal

कुणाला असतो सर्वाधिक धोका?

जे लोक दिवसभरात खूप कमी पाणी पितात किंवा ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन (UTI) होते, त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो.

Kidney stone in summer

|

Sakal

आहार आणि जीवनशैलीचा परिणाम

जास्त मीठ खाणे, अति प्रमाणात नॉन-व्हेज किंवा ऑक्सालेटयुक्त पदार्थांचे सेवन करणे आणि लठ्ठपणा यामुळे स्टोनची समस्या उद्भवू शकते.

Kidney stone in summer

|

Sakal

पाणी पिण्यावर द्या विशेष भर

किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी दिवसाला किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. लघवीचा रंग गडद होत असल्यास ते डिहायड्रेशनचे लक्षण आहे.

Kidney stone in summer

|

Sakal

लिंबू आणि संत्री ठरतात फायदेशीर

सायट्रेटयुक्त फळे जसे की लिंबू आणि संत्री यांचा आहारात समावेश करा. यामुळे लघवीतील खडे तयार होण्याची प्रक्रिया रोखण्यास मदत होते.

Kidney stone in summer

|

Sakal

आजच सावध व्हा!

जास्त मीठ आणि तळलेले पदार्थ टाळा, तसेच कडक उन्हात अतिव्यायाम करणे टाळून आपल्या किडनीचे आरोग्य जपा.

Kidney stone in summer

|

Sakal

उष्णतेमुळे पोटात जळजळ? हे घरगुती उपाय देतील त्वरित आराम!

Stomach burning home remedies

|

Sakal

येथे क्लिक करा