सकाळ वृत्तेसवा
अनंत अंबानींच्या 'वनतारा' प्रकल्पाची सुरुवात एका भावनिक क्षणातून झाली.
अनंत अंबानींनी सांगितलं की, त्यांची आई नीता अंबानी यांचं प्राण्यांवरील प्रेम आणि सेवाभाव हीच त्यांना 'वनतारा' प्रकल्पासाठी प्रेरणा ठरली.
अनंत अवघे १२ वर्षांचे असताना, जयपूरहून रणथंबोरला जात असताना त्यांनी रस्त्यावर एका हत्तीला उष्णतेमुळे त्रास होताना पाहिलं.
अनंतने आपल्या आईला सांगितलं – "आपण या हत्तीला वाचवायला हवं." त्यावेळी त्यांना हत्तीची काळजी कशी घ्यावी हे माहीतही नव्हतं.
त्या वेळी त्यांना हत्तीला काय खाऊ घालायचं, त्याचं आरोग्य कसं जपायचं याबद्दल कोणतंही शास्त्रीय ज्ञान नव्हतं.
अनंत अंबानी सांगतात, “हळूहळू आम्ही शिकलो. थेंबा थेंबाने तळे भरते.” दशकभराच्या प्रयत्नांतून त्यांनी तज्ञांची एक मजबूत टीम तयार केली.
आज 'वनतारा'मध्ये ३००-४०० हून अधिक व्यावसायिक काम करत आहेत, जे प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने काळजी घेतात.
अनंत अंबानी म्हणतात, “आजच्या जगात देव दिसत नाही. पण मला प्रत्येक प्राण्यात देव दिसतो.” ही भावना त्यांना प्राणीसेवेसाठी प्रेरित करते.