सकाळ वृत्तसेवा
तुम्हाला आवडणारी जिलेबी चविष्ट असली तरी ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे का, हे आज आपण पाहूया.
गरम दूध, थंड दही, रबडी… कुठंही जिलेबी फिट बसते! पण जिलेबीत किती कॅलरीज असतात माहिती आहे का?
होय, फक्त 100 ग्रॅम जिलेबी खाल्ली तरी तब्बल 356 कॅलरीज शरीरात जातात.
या जिलेबीतील कॅलरीज मुख्यतः मैदा, साखर आणि तेलातून येतात.
जिलेबीमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकतो.
त्यात असलेलं फॅट आणि जास्त कॅलरीजमुळे वजन वाढू शकत.
रोजच्या आहारात जिलेबी सारख्या पदार्थांमुळे डायबिटीस, हाय कोलेस्टेरॉल, आणि हार्ट प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
जिलेबी खावा पण त्याचं प्रमाण योग्य असावं.
चव तर भारीच आहे, पण आयुष्यभर फिट राहायचं असेल, तर जरा जपूनच खा.