Mansi Khambe
आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असून या निमित्ताने लाखो भाविक, वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.
विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे पवित्र स्थळ देशभरातील यात्रेकरूंना आकर्षित करते. अध्यात्माने भरलेल्या या शहरात भाविकांची मोठी गर्दी असली तरीही येथे शांत वातावरण आहे.
पंढरपूरमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, त्यापैकी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुंडलिक मंदिर, गोपाळपूर, कैकाडी महाराज मठ आणि चंद्रभागा नदी ही प्रमुख ठिकाणं आहेत.
भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपूराजवळ येते. पण आता या भीमा नदीला 'चंद्रभागा' म्हणून ओळखले जाते.
मात्र पंढरपुरात वाहणाऱ्या भीमा नदीला चंद्रभागा नाव कसं पडलं? असा अनेकांना प्रश्न पडतो. जाणून घ्या यामागचं खरं कारण.
पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीला चंद्रभागा हे नाव तिच्या विशिष्ट आकारावरून पडले आहे. पंढरपूर शहराच्या पूर्वेकडील बाजूस ही नदी चंद्राच्या आकारासारखी (चंद्रकोर) वळण घेते, त्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात.
चंद्रभागा नदी ही अतिशय पवित्र नदी मानली जाते. या नदीशी संबंधित दोन मनोरंजक पौराणिक कथा आहेत. दुसरी कथा श्रीकृष्णाच्या पुत्राशी संबंधित आहे.
एक आख्यायिका अशी आहे की, पूर्वी चंद्र (चंद्रदेव) याला शाप मिळाला होता. त्यानंतर चंद्रदेवांनी भीमा नदीत स्नान केल्यावर त्यांना शापमुक्तता मिळाली. त्यामुळे, चंद्रदेवाने प्रसन्न होऊन नदीला चंद्रभागा असे नाव दिले.
तर दुसरी आख्यायिका अशी आहे की, भीमा नदी पंढरपूर शहराच्या जवळून जाताना चंद्रकोरीसारखी (अर्धचंद्राकृती) दिसल्याने तिला चंद्रभागा असे नाव पडले.