Sandip Kapde
देशात सर्वजण दिवाळी साजरी करीत आहे. पण आपल्या नेहमी एक प्रश्न पडतो की आधी दिवाळी कशी साजरी होत असे.
शिव काळात दिवाळी कशी साजरी होत असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते.
ज्ञानेश्वरीत देखील दिवाळीचा उल्लेख आहे.
तुकाराम महाराजांच्या काळात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असा प्रसिद्ध उल्लेख आपल्याला सापडतो.
शिवाजी महाराजांच्या जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरचा ते बालपणी सवंगड्यांना घेऊ किल्ले बनवत, शिवभारत या ग्रंथातील ७ व्या अध्यायात ही माहिती दिली आहे.
शिवाजी महाराज किल्ल्यांकडे बोट दाखवून म्हणत हे सर्व गड किल्ले माझे आहेत. त्यामुळे दिवाळीत किल्ले बनवण्याची प्रथा सुरु झाली असेल.
१३ व्या शतकाच्या सुरुवातीपासून दिवाळीला महत्व आहे. ज्ञानेश्वरीत याचे संदर्भ आहेत.
दिवाळी आणि फटाके असं रंजक समीकरण आहे. इतिहासात देखील फटाक्यांचे अनेक संदर्भ आहेत. पेशव्यांच्या काळात तावदानी रोषणाई हा एक प्रकार होता.
काचेच्या कमानी लावून त्याला आरसे लावून दारूकाम केलं जाईल. त्यामधून रंगीबेरंगी रोषणाई बाहेर पडत असे.