Sandip Kapde
तुम्हाला माहिती आहे का, की छत्रपती शिवाजी महाराजांनीच मराठी भाषेला नवजीवन देत तिला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले होते?
राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या लक्षात आले की मराठी भाषेवर परकी यावनी भाषेचा अतीप्रभाव पडत चालला असून त्यामुळे मराठीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
लोक आपल्या मुलांची नावेही यावनी शब्दांवरून ठेवू लागले होते. त्यामुळे महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना पाचारण केले.
महाराजांनी त्यांना आदेश दिला की यावनी शब्दांसाठी गिरवाण भाषेत योग्य पर्यायी शब्द शोधावेत.
या काळात १४०० शब्दांचा समावेश असलेला शब्दसंग्रह तयार करण्यात आला, ज्याला ‘राजकोष’ असे नामकरण करण्यात आले.
त्यामध्ये लेखनवर्ग, किल्ल्यांचा विभाग आणि शस्त्रविभाग असे विभाग होते. त्याआधी शस्त्रांची नावे अरबी भाषेतून आलेली होती.
"तलवार" हा शब्द परकीय असून "खड्ग" हा आपल्या भाषेतील शब्द आहे. अनेक अशा परकीय शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर हस्ताक्षर असलेल्या बाळाजी आवजी यांना बोलावले. त्यांच्या हस्ताक्षराची ख्याती एवढी होती की, चौथीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचे एक पत्र आजही समाविष्ट आहे.
शिवाजी महाराजांनी आवजी यांना विचारले, "तुमच्याकडे पत्रांचे किती प्रकार आहेत?" यावर आवजी उत्तरले, "सुमारे ७० ते ८० प्रकार आहेत."
महाराजांनी सर्व पत्रांचे अर्थ तयार करण्याचे आदेश दिले.
बाळाजी आवजींनी मायने लिहिल्यानंतर मराठीतील पत्रव्यवहाराची सुरूवात झाली, आणि हे परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरले.
इथे स्वाभिमान जपला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, "माझे लोक, माझी भाषा."
निनाद बेडेकर यांच्या एका भाषणात हे सर्व मांडले गेले आहे.