Sandip Kapde
डॉ. आंबेडकर उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी लढा सुरू केला.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
त्यांच्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी त्यांना स्वयंस्फूर्तीने बाबासाहेब म्हणून संबोधायला सुरुवात केली.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
बाबासाहेब बनण्याची ही संपूर्ण प्रक्रिया कुठल्याही ठरवून केलेल्या सन्मानामुळे नव्हे, तर लोकभावनेतून घडली.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
लोकांना त्यांच्या मोठेपणाची आणि सहानुभूतीची जाणीव होत गेली आणि ‘बाबा’ हा शब्द आपोआप उदयास आला.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
बाबा या शब्दाचा व्यापक अर्थ आई-वडील, आधार, मित्र आणि मार्गदर्शक असा आहे.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
त्यांच्या अनुयायांमध्ये इतका जिव्हाळा होता की चुकीच्या अफवेनेही लोक व्याकूळ होत.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
एका महिलेला त्यांच्या निधनाची अफवा ऐकून रडू लागले असता, बाबासाहेबांना पाहताच तिचं दुःख हास्यात बदललं.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
सत्याग्रहाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
महिलांना शिक्षण, स्वच्छता आणि स्वाभिमान यांचे महत्व त्यांनी स्पष्टपणे समजावून सांगितले.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
दारू, अस्वच्छता आणि गैरप्रथा टाळण्याचा संदेश त्यांनी समाजात खोलवर रुजवला.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
सत्याग्रहानंतर महिलांनी त्यांच्यावर लोकगीतं रचली आणि ते लोककथेतील ‘बाबा’ बनले.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
समाज माणूस घडवतो, तसेच महान माणूसही समाज घडवतो हे ते आपल्या कृतींतून दाखवत राहिले.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
त्यांचे शिक्षण आणि व्यवसाय हे सर्व दुर्लक्षित समाजघटकांच्या प्रबोधनासाठीच होते.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
तरुण वयातच ते सर्वत्र आदराचे प्रतीक बनले आणि बाबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
समाजाच्या कणाकणांत मिसळून जाणारी त्यांची मानवतावादी वृत्तीच त्यांना ‘बाबासाहेब’ बनवणारी खरी महानता ठरली.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
Dr Bhimrao Ramji Ambedkar
esakal