एक विधवा मुघल साम्राज्याची सर्वात शक्तिशाली महिला कशी बनली? वाचा 'हा' इतिहास

Mansi Khambe

मुघल साम्राज्याची शक्तिशाली महिला

१८५७ साली मुघल साम्राज्य संपले असले तरीही याकाळात इतिहासाला अनेक कथा मिळाल्या. यातील एक कथा जहांगीरची पत्नी नूरजहाँची आहे. नूरजहाँ मुघलांच्या साम्राज्यात न राहता पतीसोबत भारतावर राज्य केले.

Nur Jahan powerful queen of mughal empire | ESakal

काय आहे इतिहास

मात्र पतीच्या मृत्यूनंतर जहांगीरशी वाद घालणारी नूरजहाँ मुघल साम्राज्याची सर्वात शक्तिशाली महिला कशी बनली हे जाणून घेऊया?

powerful queen of mughal empire nur jahan | ESakal

नूरजहाँचा जन्म कुठे झाला.

नूरजहाँचा जन्म ३१ मे १५७७ रोजी कंदहार (अफगाणिस्तान) येथे झाला. तिचे खरे नाव मेहरुन्निसा होते. नूरजहाँ ही एक पदवी आहे जी मेहरुन्निसाला मुघल शासक जहांगीरशी लग्न केल्यानंतर मिळाली.

nur jahan | ESakal

पहिले लग्न अलीकुली खानसोबत झाले

मेहरुन्निसाचे पहिले लग्न मुघल साम्राज्यासाठी काम करणाऱ्या अली कुली खानशी झाले होते. मुघल बादशहाने अली कुली खानला शेर अफगाण ही पदवी दिली होती.

powerful queen of mughal empire | ESakal

शेर अफगाणला जहांगीरचा आदेश

एकेकाळी अकबराचा विश्वासू शेर अफगाणवर जहांगीरविरुद्ध कट रचत असल्याचा आरोप केला गेला. यावर जहांगीरने शेर अफगाणला शाही दरबारात हजर राहण्याचा आदेश जारी केला.

jahangeer | ESakal

शेर अफगाणचा पराभव मृत्यू

जहांगीरने जरी केलेल्या आदेशानंतर बंगालचा तत्कालीन गव्हर्नर आणि शेर अफगाण यांच्यात भांडण झाले. यात शेर अफगाणचा मृत्यू झाला.

Nur jahan powerful queen | ESakal

जहांगीर मेहरुन्निसाच्या प्रेमात पडला

पतीच्या मृत्युनंतर मेहरुन्निसाच्या जहांगीरच्या राजवाड्यात राहण्यासाठी जागा देण्यात आली. याकाळात जहांगीरने मेहरुन्निसाला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तिला आपली बेगम बनवण्याचा निर्णय घेतला.

Jahangeer | ESakal

मेहरुन्निसाला मिळाली नूरजहाँ बेगम पदवी

मेहरुन्निसाने जहांगीरसोबत लग्न केल्यानंतर सम्राट जहांगीरने मेहरनिसाला नूरजहाँ बेगम ही पदवी दिली.

Nur jahan and jahangeer married | ESakal

जहांगीरने नूरजहाँला दिली सत्ता

जहांगीर व्यसनाच्या आहारी गेला होता. यामुळे मुघल साम्राज्याच्या आदेशासोबतच त्यांनी सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार मेहरुन्निसा म्हणजेच नूरजहाँला दिले.

nurjahan powerful queen | ESakal

राजवटीची सूत्रे नूरजहाँच्या हाती

जहांगीरने नूरजहाँला सत्ता दिल्यानंतर हळूहळू संपूर्ण मुघल राजवटीची सूत्रे नूरजहाँच्या हाती गेली. तिने पुरुषांसाठी बनवलेल्या व्हरांड्यात सभा घेण्यास सुरुवात केली.

nurjahan powerful queen | ESakal

चांदीच्या नाण्यांवर नूरजहाँचे नाव

१६१७ मध्ये मुघल राजवटीने चांदीची नाणी जारी केली ज्यात जहांगीरसह नूरजहाँचे नाव लिहिलेले होते. नूरजहाँच्या या कामगिरीमुळे मुघल राजवटीच्या दरबारातील व्यापारी आणि रेकॉर्ड कीपरमध्ये तिला विशेष दर्जा मिळू लागला.

nurjahan powerful queen | ESakal

शिकारीची आवड

नूरजहाँला शिकार करण्याचीही आवड होती. ती शिकारीला जायची. तिने तिच्या इच्छेनुसार इमारतींची रचना केली. ती गरीब महिला आणि समाजातील पीडित लोकांच्या समस्या सोडवत असे.

nurjahan powerful queen | ESakal

नूरजहाँच्या हाती सैन्याची कमान

सम्राट जहांगीरला कैद करण्यात आले, तेव्हा नूरजहाँने त्याला वाचवण्यासाठी सैन्याची कमानही घेतली. म्हणूनच त्यांचे नाव मुघल इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.

nurjahan powerful queen | ESakal

शिवरायांना 'या' फुलाची उपमा दिली होती, कारण ठरला होता औरंगजेब…

Chhatrapati Shivaji Maharaj | ESakal
हे देखील वाचा