Vrushal Karmarkar
आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पदव्या दिल्या आहेत. यात क्षत्रियकुलावंतस असेल किंवा अजून काही पदव्या तुम्ही ऐकल्या असतील.
पण तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांना चाफा ही पदवी दिल्याचे ऐकले आहे का? त्यांच्या दरबारी असलेले राजकवी भूषण यांनी एक कविता लिहिली आहे.
या कवितेत राजकवी भूषण यांनी शिवरायांचा चाफा अशा उल्लेख केला आहे.
राजकवी भूषण म्हणतात, कुरम कमल कमधुज है कदम फूल, गौर है गुलाब राना केतकी विराज है, पांडुरी पवार जुही सोहत है चन्दावत, सरस बुन्देला सो चमेली साजबाज है, ‘भुषण’ भनंत मुचकुन्द बड गुजर है, बधेले बसंत सब कुसुम समाज है.
म्हणजेच कछुआ वंशी जयपूरचे राजा कमळासारखे आहेत. कदंबराजे कदंब फुलासारखे आहेत. गोर राजे गुलाबासारखे आहेत. उदयपूरचे राणा केतकीच्या फुलासारखे आहेत.
पवाप वंशिक क्षत्रिय हे पांढर म्हणजेच, कुंद फुलासारखे आहेत. कंधावत राजपूत हे जुई आहेत. तर बुंदेले हे फुललेले चमेली आहेत. गुजरवांशिक क्षत्रिय मुचकुन्द फुलासारखे आहेत.
यावरून देशातील सर्व राजे एक फुलांचा ताटवा आहे. तर औरंगजेबरुपी एक भुंगा आहे. हा या सर्व फुलांभोवती फिरत आहे. हा त्यांचा रस सोशत आहे.
पण एक ठिकाण असं आहे तिथे हा भुंगा अजिबात बसत नाही. यावर कवी म्हणतात, लेई रस एतेन बेठीन शकत अहे, अली नवरंग जेब चंपो शिवराज है...
म्हणजेच, औरंगजेब हा भुंगा असला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे चाफा आहेत. त्यावर कधीच कोणताच भुंगा बसत नाही.
पेशवेकाळातील 'साडेतीन शहाणे' कोण होते? चौथ्याला अर्धा शहाणा का म्हणायचे? जाणून घ्या...