Sandip Kapde
औरंगजेबाचा मुलगा अकबर मराठ्यांच्या आश्रयाला गेला ही बातमी समजताच मुघल बादशहाला मोठा धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
मराठा साम्राज्याचा नाश करण्यासाठी औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत उतरून मोठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
त्याने हसनअली आणि शहजादा मुअज्जम यांना कोकणात घुसखोरी करून मराठ्यांवर दबाव आणण्याचे आदेश दिले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
मात्र मराठ्यांच्या तडाख्यामुळे या दोन्ही मुघल मोहिमा अपयशी ठरल्या आणि त्यांना कोकणातून माघार घ्यावी लागली.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
या अपयशानंतर औरंगजेबाने पुन्हा कोकण मोहीम उघडली आणि तिचे नेतृत्व रणमस्तखानाकडे सोपवले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
रणमस्तखानासोबत बहादुरखान, मुकर्रमखान, याकूतखान, रामसिंह राठोड आणि पद्मसिंह यांसारखे मुघल सरदार होते.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
रणमस्तखान कल्याणकडे चालून आला, पण त्याला तोंड देण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजी महाराज रणांगणात उतरले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
संभाजी महाराजांसोबत रुपाजी भोसले, केसोपंत, निळोपंत, मानाजी मोरे आणि सुमारे दहा हजार मराठा सैनिक होते.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
मराठ्यांनी अचानक हल्ले करत रणमस्तखानाच्या सैन्याला अक्षरशः हैराण करून सोडले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
मराठ्यांनी खानाच्या रसदीचे मार्ग बंद केल्यामुळे मुघल सैन्याची मोठी कोंडी होऊ लागली.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
कल्याणच्या ईशान्य बाजूला टिटवाळा गावाजवळ दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
लढाईच्या पहिल्याच टप्प्यात मराठ्यांनी मुघल सैन्याला जबर धक्का देत रणांगणावर लोळवले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
या संग्रामात पद्मसिंह राठोड मारला गेला, तर आजारी असलेला रामसिंह राठोडही जास्त प्रतिकार करू शकला नाही.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
लढाईदरम्यान हरीसिंह राठोड मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि त्याला कैद करण्यात आले.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
२७ फेब्रुवारी १६८३ रोजी टिटवाळ्याजवळ झालेल्या या लढाईत संभाजी महाराजांनी मुघलांना मोठा धडा शिकवला.
Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj’s Pen Still Exists
esakal