सूरज यादव
प्रतापगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा वध केला. ही वाघनखं लंडनमधून सध्या भारतात आणण्यात आली आहेत.
wagh nakh
Esakal
ब्रिटनच्या संग्रहालयात असलेली वाघनखं महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये ठेवली जाणार आहेत. सध्या वाघनखं कोल्हापुरात आहेत.
wagh nakh
Esakal
महाराष्ट्रातून ही वाघनखं १८१८मध्ये लंडनला गेली.साताऱ्याच्या वंशजांकडे त्यावेळी ही वाघनखं होती.
wagh nakh
Esakal
ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी असलेल्या जेम्स ग्रँड डफला पेशव्यांनी ही वाघनखं दिली होती. हा अधिकारी साताऱ्यात १८१८ ते १८२४ या काळात कार्यरत होता.
wagh nakh
Esakal
भारतातून जाताना जेम्स ग्रँड डफने ही वाघनखं ब्रिटनला नेली. त्याच्या वंशजांनी वाघनखं युकेतील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला दिली.
wagh nakh
Esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला होता.
wagh nakh
Esakal
प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या या लढाईत अफझलखानाचा वध केल्यानं स्वराज्यावरचं मोठं संकट दूर झालं होतं.
wagh nakh
Esakal
वाघनखं लंडनहून जुलै २०२४ मध्ये भारतात आणण्यात आली आहेत. ३ वर्षांच्या कालावधीसाठी ती महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
wagh nakh
Esakal
Shingroba Mandir
Esakal