Sandip Kapde
पुण्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक म्हणजे स्वारगेट. हे ठिकाण जसे वाहतुकीसाठी ओळखले जाते, तसेच त्याच्या नावामागेही एक समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
स्वारगेट हे ऐतिहासिक ठिकाण असून, शिवकालीन काळातही त्याला मोठे महत्त्व होते.
पुण्यातील लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालपण घालवले. पुण्याजवळील मावळ प्रदेशात त्यांना अनेक सवंगडी लाभले.
शिवाजी महाराजांनी रायगडावर पहिली राजधानी स्थापन केली, त्यामुळे आदिलशाही आणि मुघलांसारखे शत्रू सतर्क झाले.
आदिलशहाने स्वराज्यावर आक्रमण केले, पण अफजलखानाची दारुण अवस्था पाहून तो घाबरला.
1660 साली शाहिस्तेखान प्रचंड आत्मविश्वासाने महाराष्ट्रात प्रवेशला आणि त्याने चाकण, कल्याण, सासवड व इंदापूर जिंकले.
मात्र मराठ्यांना हरवणे शक्य नव्हते. हे खानाला माहित होत. त्याने पुणे जिंकून घेतले नंतर शिवरायांच्या लालमहालात मुक्काम ठोकला.
महाराजांना याचा अत्यंत संताप आला होता, मात्र त्यांनी संयम राखून शाहिस्तेखानाचा सामना केला.
शाहिस्तेखान तब्बल दोन वर्षे पुण्यात ठाण मांडून होता. त्या काळात पुण्याचे रूप छावणीसारखे झाले होते, आणि ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या होत्या.
मुख्य चौकी आताच्या स्वारगेट येथे होती, जिथे नेहमीच घोडे, टांगे आणि गस्त असायची. लग्नाच्या मिरवणुकीचा बहाणा करून खुद्द शिवाजी महाराजांनी पुण्यात प्रवेश केला होता.
६ एप्रिल १६६३ च्या पहिल्या प्रहरात अंधाराचा फायदा घेत महाराज आणि मावळे महालात शिरले. या हल्ल्यात शाहिस्तेखानाचा मुलगा ठार झाला, तर शाहिस्तेखान गंभीर जखमी झाला.
शिवाजी महाराज अतिशय चपळाईने मुघल सैन्य सावध होण्याच्या आत सिंहगडाच्या दिशेने निघाले. तसेच, मुघल सैनिकांना भ्रमित करण्यासाठी कात्रज घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या. हा प्रकाश पाहून मुघल सैन्य कात्रजच्या दिशेने गेले आणि त्यांची फसवणूक झाली.
आतापर्यंत पुण्यावर राज्य करणाऱ्या शासकांनी पहिली चौकी स्वारगेट येथे उभारली होती. तेथे ओळख पटवल्यानंतरच पुण्यात प्रवेश मिळत असे.
ही महत्वपूर्ण ठिकाणे इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले.
म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.