शंभू महाराजांनी स्वतःची केलेली भगवान रामाशी तुलना, शिवराय म्हणजे...

Sandip Kapde

रामराज्य

"'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे परमराम भक्त होते आणि 'रामराज्य' हा त्यांच्या स्वराज्याची आदर्श संकल्पना होती."

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

धोरण

शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात परस्त्रीला सदैव मातेसमान सन्मान देण्याचे तसेच शेतातील गवताच्याही काडीला इजा न होईल अशी दक्षता घेण्याचे धोरण अंगीकारले.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

रामायण

शिवाजी महाराजांच्या बालपणात जिजाऊ माँसाहेबांनी त्यांना रामायणातील कथा सांगितल्या, ज्यामुळे त्यांच्या मनात रामायणाबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

राम भक्ती

इतिहासाचा अभ्यास केला असता, शिवाजी महाराजांची रामभक्ती ठळकपणे समोर येते.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

कवींद्र परमानंद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून कवींद्र परमानंद यांनी 'शिवभारत' या ग्रंथाची रचना केली.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

रामायण

शिवाजी महाराजांना केवळ बारा वर्षांचे असतानाच रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांची विशेष आवड होती.

जेधे आणि बांदल

जेधे आणि बांदल घराण्यांचा शिवाजी महाराजांच्या कार्यात अत्यंत मोलाचा सहभाग होता.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

शिवाजी महाराज

‘जेधे शकावली’ या ग्रंथातील एका ओळीत उल्लेख आहे – ‘हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवराजाला,’ ही ओळ थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

शाहिस्तेखान

शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला, आणि 'सभासद बखरी'त त्याचे वर्णन 'कलियुगाचा रावण' असे केले आहे.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

राजगड

राजगड किल्ल्यावरच्या माचीला महाराजांनी 'संजीवनी माची' हे नाव दिले होते.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

शिवकालीन

शिवकालीन पोवाड्यांमध्ये महाराजांच्या तोंडी हे प्रसिद्ध वाक्य आहे – "भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास (अफजलखानास) काय म्हणून!"

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

केशवपंडित

संभाजी महाराजांनी केशवपंडित या पुरोहिताला 'रामायण' ऐकवल्याबद्दल बक्षीस दिले.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

दानपत्र

संभाजी महाराजांनी दानपत्रात लिहिले, "माझे वडील राजा दशरथासारखे असून, मी त्यांचा रामसारखा पुत्र आहे!"

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

संभाजी महाराजांचे शिक्षण -

केशव पंडित शिवाजी महाराजांचे दानाध्याक्ष्य व पुरोहित होते . त्यांनी संभाजी महाराजांना प्रयोगरूप रामायण ऐकवले त्याबद्दल संगमेश्वर तालूक्यातील जमीन दानपत्र करून दिली होती.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रामायणाची गोडी आणि त्यांची धार्मिकता त्यांच्या प्रत्येक निर्णयात दिसून येते.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी 'भारत' कसा होता?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explore India before Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा