Sandip Kapde
पेशव्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर मुघलांचा जामदारखाना मिळावा म्हणून त्रिंबक सूर्याजी प्रभूंनी त्र्यंबकेश्वराला नवस केला.
Nashik Diamond
esakal
त्र्यंबकगड ताब्यात घेतल्यानंतर पेशव्यांनी सोन्याचा रत्नजडित मुकुट आणि दागिने शिवाला अर्पण केले.
Nashik Diamond
esakal
त्याचवेळी मुघलांच्या खजिन्यातील ८९ कॅरेटचा नाशिक हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात दाखल झाला.
Nashik Diamond
esakal
दुसरे बाजीराव पळून जात असताना खजिन्याचा काही भाग नाशिकमध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली.
Nashik Diamond
esakal
ह्या माहितीवरून कॅप्टन ब्रिग्जला तातडीने नाशिक खजिना हस्तगत करण्याची मोहिम दिली गेली.
Nashik Diamond
esakal
ब्रिग्जने नाशिकचा खजिना शोधून त्याची मोठी लूट केली आणि मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या.
कर्नल मॅकडोवेलने ब्रिग्जवर लुटीच्या मोजदादीत पारदर्शकता न ठेवल्याची तक्रार केली.
ह्या लुटलेल्या खजिन्याचा मोठा भाग पुढे लंडनमधील दख्खन ट्रेझरीकडे पाठवला गेला.
या लुटीत मिळालेल्या ८९ कॅरेटच्या हिऱ्याला ‘Nassak Diamond’ हे नाव देण्यात आले.
१८३० मध्ये लंडनच्या दख्खन खजिन्याने हा हिरा रंडेल अँड ब्रिज या ज्वेलर्सना ३००० पौंडांना विकला.
१८३१ मध्ये रॉबर्ट ग्रॉसव्हेनरने हा हिरा विकत घेऊन आपल्या शोभेच्या तलवारीच्या म्यानात जडवला.
१९२० मध्ये ग्रॉसव्हेनरच्या वंशजांनी तो न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध ज्वेलर हॅरी विन्स्टनला विकला.
हॅरी विन्स्टनने हा हिरा कापून ४३ कॅरेटचा बनवून तो एका अंगठीत बसवला.
सध्या हा ऐतिहासिक ‘नाशिक हिरा’ जिनेव्हातील मौवाद कंपनीकडे असून त्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपयांपर्यंत जाते.
Karneshwar Temple
Sakal