Saisimran Ghashi
अंतराळवीर सुनीता विल्यम्स 9 महिने अवकाश स्थानकात राहून पृथ्वीवर परत आल्या आहेत.
आता अनेक लोकांना हे अंतराळवीर अवकाश कसे राहिले काय खाल्ले, आंघोळ केली का? असे प्रश्न पडत आहेत.
अंतराळ स्थानकात (International Space Station - ISS) गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने अंघोळ करणे शक्य नसते.
तिथे पाणी तरंगण्यास सुरुवात करते, त्यामुळे शॉवर घेणे किंवा बादलीतून पाणी ओतणे शक्य होत नाही. म्हणूनच अंतराळवीर विशेष पद्धती वापरून शरीर स्वच्छ करतात.
अंतराळवीर ओलसर टॉवेल किंवा वाइप्स (म्हणजेच आर्द्र कापड) वापरून शरीर पुसतात. हे टॉवेल विशेषतः अंतराळासाठी डिझाइन केलेले असतात.
ISS मध्ये साबण आणि पाण्याने फेस काढून धुणे कठीण असते, त्यामुळे अंतराळवीर "No-Rinse Soap" किंवा "Rinse-Free Body Wash" वापरतात. हे एक प्रकारचे द्रव पदार्थ असते, जे त्वचेला लावून फक्त टॉवेलने पुसले जाते.
केस धुण्यासाठी "No-Rinse Shampoo" वापरला जातो, जो केसांमध्ये चोळल्यानंतर टॉवेलने पुसून टाकला जातो. यात फोम असतो, पण तो धुण्याची गरज लागत नाही.
अंतराळ स्थानकात पाण्याची मोठी कमतरता असते, त्यामुळे तिथले पाणी रीसायकल केले जाते.
पाणी जडत्वानुसार तरंगत असल्याने थेंब हवेत तरंगतात. त्यामुळे जर थोडे जरी पाणी बाहेर आले, तर ते हवेत फिरत राहते आणि अंतराळवीरांना ते जपून हाताळावे लागते.