Saisimran Ghashi
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलायनरने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले.
मात्र, स्टारलायनरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांचा पृथ्वीवर परतण्याची वेळ लांबली. अखेर 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुरक्षित येतील असे अपेक्षित आहे.
सुनीता विल्यम्स यांच्या कुटुंबात कोण आणि किती व्यक्ती आहेत जाणून घेऊया.
डॉ. दीपक पांड्या हे प्रसिद्ध न्यूरोअनाटॉमिस्ट होते. ते मूळचे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावचे रहिवासी होते.
उर्सुलिन बोनी (बोनी जालोकर पांड्या) या स्लोव्हेनिया येथील आहेत.
जय थॉमस पांड्या हे सुनीताचे मोठे भाऊ आहेत. डायना एन. पांड्या या सुनीताच्या मोठी बहिण आहेत.
मायकल जे. विल्यम्स हे सुनीताचे पती आहेत. ते टेक्सासमध्ये पोलिस अधिकारी आहेत आणि पूर्वी हेलिकॉप्टर पायलट म्हणून अमेरिकन नौदलात कार्यरत होते.
सुनीता विल्यम्स आणि मायकल जे. विल्यम्स यांना संतती नाही.
सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेमुळे जगभर त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत.