स्पेस स्टेशनमध्ये शॉवर नसतो, मग अंतराळवीर अंघोळ कशी करतात?

Shubham Banubakode

शॉवर घेणं शक्य?

पृथ्वीवर आपण रोज शॉवर घेतो. पण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पृथ्वीसारखा शॉवरच नाही. मग अंतराळवीर अंघोळ कसे करतात?

How astronauts bathe

|

esakal

नुकसानीची शक्यता

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने पाणी खाली पडत नाही. ते हवेत तरंगत राहते. त्यामुळे शॉवर सुरू केला तर पाणी संपूर्ण केबिनमध्ये पसरू शकते.

How astronauts bathe

|

esakal

शॉवर शक्य नाही

पाण्याचे छोटे थेंब इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये गेले तर मोठा बिघाड होऊ शकतो. म्हणूनच अंतराळात सामान्य शॉवर वापरणे शक्य नाही.

How astronauts bathe

|

esakal

पाण्याची गरज नाही

अंतराळवीर ओला टॉवेल, ओलसर वाइप्स आणि No-Rinse Body Wash वापरतात. म्हणजे साबण लावल्यानंतर पाण्याने धुण्याची गरजच पडत नाही.

How astronauts bathe

|

esakal

खास शाम्पू

केसांसाठी खास Rinseless Shampoo वापरला जातो. हा शॅम्पू लावल्यानंतर फक्त टॉवेलने पुसायचं असतं. पाणी वापरण्याची गरज नसते.

How astronauts bathe

|

esakal

पाण्याचं महत्त्व

ISS वर पाणी खूप मौल्यवान असतं. घाम, हवेतली आर्द्रता आणि इतर पाणीही शुद्ध करून पुन्हा वापरलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी खर्च करणं शक्य नाही.

How astronauts bathe

|

esakal

शॉवरचा प्रयोग

१९७० च्या दशकात NASA च्या Skylab अंतराळ स्थानकावर विशेष Zero-G शॉवरची चाचणी झाली होती. पण हा प्रयोग पुन्हा करण्यात आला नाही.

How astronauts bathe

|

esakal

विशेष कीट

NASA च्या अधिकृत मानकांनुसार अंतराळवीराला शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी ओलसर वाइप्स, नो-रिन्स क्लिन्झर, खास शॅम्पू दिले जाते.

How astronauts bathe

|

esakal

स्पेसमध्ये शरीरसंबंध का टाळले जातात? NASA ने सांगितलं यामागचं मोठं कारण

Why physical relation Is Not Allowed in Space

|

esakal

हेही वाच -