सकाळ डिजिटल टीम
इंडोनेशियातील जांबी प्रदेशात रबराच्या बागेत गेलेल्या एका पन्नाशीच्या महिलेला अजगराने गिळल्याची थरारक घटना घडली.
Python Attacks
sakal
रविवारी कामावर गेलेली महिला घरी न परतल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता, एका अजगराचे पोट अत्यंत फुगलेले दिसून आले.
Python Attacks
sakal
गावकऱ्यांनी त्या अजगराला मारून त्याचे पोट चिरले असता, त्यामध्ये त्या महिलेचा मृतदेह सुरक्षित अवस्थेत आढळला.
Python Attacks
sakal
अजगराचा जबडा अतिशय लवचिक अस्थिरज्जूंनी जोडलेला असतो, ज्यामुळे मोठे भक्ष्य गिळण्यासाठी तो आपला जबडा कितीही ताणू शकतो.
Python Attacks
sakal
अजगर दबा धरून आपल्या भक्ष्याभोवती स्वतःला घट्ट गुंडाळतो, ज्यामुळे श्वास कोंडून किंवा कार्डिअक अरेस्टमुळे भक्ष्याचा काही मिनिटांत मृत्यू होतो.
Python Attacks
sakal
नवाला गिळताना शरीराची खांद्याची हाडं मोठा अडथळा ठरतात, पण अजगराची प्रचंड ताकद अशा मोठ्या शिकारीलाही सहज फस्त करते.
Python Attacks
sakal
इंडोनेशियात माणसाला अजगराने गिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर सुलावेसी प्रांतात २०१७ आणि २०१८ मध्येही अशाच घटना घडल्या आहेत.
Python Attacks
sakal
अजगर प्रामुख्याने सस्तन प्राणी खातात, पण आकार वाढल्यावर पोट भरण्यासाठी ते मोठ्या प्राण्यांना आणि मानवांनाही आपले भक्ष्य बनवतात.
Python Attacks
sakal
तरुणांना वेड लावणाऱ्या अॅनिमेशनची सुरुवात नेमकी कधी आणि कुठे झाली?
History of Animation
sakal