संतोष कानडे
कुत्र्यांची वास ओळखण्याची क्षमता माणसांपेक्षा अनेक पटींनी अधिक असते.
प्रत्येक माणसाच्या शरीराचा एक विशिष्ट नैसर्गिक वास असतो, जो कुत्रे ओळखू शकतात.
कुत्रे आपल्या परिसरातील लोकांचे वास लक्षात ठेवतात.
प्रत्येक गल्लीतील कुत्रे त्या भागातील रस्ते, घरे आणि इतर प्राण्यांचे वास ओळखतात.
दुसऱ्या गल्लीतून आलेल्या व्यक्तीच्या कपड्यांवर तिथल्या वेगवेगळ्या वासांचे कण असू शकतात.
हे वास कुत्र्यांना परिचित नसल्यामुळे ते त्या व्यक्तीकडे अधिक लक्ष देतात.
कुत्रे केवळ वासावरच नाही, तर माणसाची चाल, आवाज आणि हालचालीही ओळखतात.
आपल्या परिसरात वारंवार येणाऱ्या व्यक्तींची त्यांना हळूहळू सवय होते.
अनोळखी व्यक्ती दिसल्यास काही कुत्रे भुंकून किंवा तिच्या मागे जाऊन प्रतिक्रिया देतात.
त्यामुळे कुत्र्यांना दुसऱ्या गल्लीतून आलेली व्यक्ती ओळखण्यास मदत होते.