Vrushal Karmarkar
मंत्रालयात या ना त्या कामाच्या निमित्ताने यावे लागते. यासाठी प्रवेश पासासाठी रांग लावावी लागते. त्यानंतर हा पास मिळतो.
मात्र विधीमंडळ आणि मंत्रालयात जाण्यासाठी पास कसा मिळतो? हे तुम्हाला माहिती आहे का? आज याची प्रक्रिया काय असते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रवेश पासासाठी रांग लावण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. याचे कारण आहे ऑनलाईन पास. सरकारने १५ जानेवारी २०१५ पासून प्रवेशासाठी ऑनलाईन पास सुविधा सुरू केली आहे.
मंत्रालयात जाण्यासाठी कामाचा तपशील आणि नेमका कोणत्या मंत्र्यांना भेटायचं आहे? त्याची माहिती यातील तिथे नोंदणी करून त्यानंतर दुपारी अडीच नंतर पास मिळतो.
विधिमंडळासाठी आमदार किंवा विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या शिफारस पत्रानंतर पास मिळतो. पिवळ्या रंगाचा पास एक दिवसासाठी असतो.
मात्र पास मिळविण्यासाठी लांबचलांब रांगेत खूप वेळ तिष्ठावे लागते. त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर परिचयपत्रासह अर्ज दाखल करावा लागतो.
नंतर सुरक्षा कर्मचारी रजिस्टरमध्ये आवश्यक नोंदणी करून सहीशिक्यासह प्रवेश पास देतात. मंत्रालयात येणार्यांची सुविधा व्हावी यासाठी राज्य शासनाने एक साईट तयार केली आहे.
https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरच एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यात इच्छुक ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत.
यासाठी आधार कार्ड किंवा पॅनकार्ड लागते. तसेच तुमचा फोटो तिथे घेतला जातो. बाहेरील कोणती गोष्ट आत नेण्यास मनाई आहे. पाससाठी ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे.
त्याची प्रिंट काढून मंत्रालयात दाखविता येणार आहे. प्रिंट नसेल तर मोबाईलवरही स्क्रीन शॉट मान्य केला जातो.
मंत्रालयात प्रवेश पास काऊंटरची संख्याही वाढविली आहे. तसेच पास देण्याचे काम सकाळी १० पासूनच सुरू होते.
स्त्रियांमध्ये आढळणारे 5 प्रमुख पोटाच्या चरबीचे प्रकार