Sandip Kapde
'शाका लाका बूम बूम' या मालिकेत संजूची भूमिका साकारणारा किंशुक वैद्य लहानपणी खूप लोकप्रिय झाला होता.
किंशुक वैद्यने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.
आता किंशुक आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक नवीन सुरुवात करत आहे.
त्याने आपल्या दीर्घकालीन मैत्रीण आणि कोरियोग्राफर दीक्षा नागपालसोबत लग्न केलं आहे.
त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत मान्यता देत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या खास दिवशी किंशुक आणि दीक्षा पारंपरिक निळ्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहेत.
किंशुक टीव्ही मालिकांमध्ये काम करतोय.
त्याचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
'संजू' म्हणून प्रसिद्ध असलेला किंशुक आता प्रेक्षकांच्या नजरेतून दूर गेला असला तरी तो अजूनही सक्रिय आहे.
दोघांचं नातं आता एका नवीन टप्प्यावर पोहोचले आहे.