Sandip Kapde
भारताचे नवे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आज ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
बी. आर. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला.
ते एका राजकीय कुटुंबातून आले असून त्यांचे वडील रामकृष्ण गवई हे आमदार, खासदार आणि तीन राज्यांचे राज्यपाल होते.
बी. आर. गवई २००३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
सरन्यायाधीश म्हणून गवई यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असेल.
ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.
सरन्यायाधीशांचा मासिक पगार २,८०,००० रुपये आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा मासिक पगार २,५०,००० रुपये आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दरमहा २,२५,००० रुपये पगार मिळतो.
जिल्हा न्यायाधीशांचा पगार ५७,७०० ते ७०,२९० रुपये आहे, जो निवड श्रेणीत १,६३,०३० ते २,१९,०९० रुपये होतो.
न्यायाधीशांना पगारासोबत विविध भत्ते आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.
सरन्यायाधीशांना वार्षिक १६,८०,००० रुपये पेन्शन आणि २० लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वार्षिक १५,००,००० रुपये पेन्शन मिळते.
न्यायाधीशांना निवास, फर्निचर, सुरक्षा आणि इतर सुविधा देखील पुरवल्या जातात.