Saisimran Ghashi
राजस्थानातील एका कुत्र्याची गोष्ट जी आजही इतिहासात नोंदली गेली आहे
मालकासाठी प्राण देणारा हा कुत्रा, केवळ निष्ठावान नाही तर रणांगणात पराक्रमीसुद्धा!
१६७०-७१ मध्ये राजस्थान आणि हरियाणा सीमेजवळचं लोहारू राज्य औरंगजेबाच्या हल्ल्याच्या टोकावर!
ठाकूरांचे दोन पुत्र महासिंह, नौरबाजी आणि त्यांचा विश्वासू सरदार बख्तावरसिंग.
इतिहासात केवळ “बख्तावरसिंगचा कुत्रा” म्हणून ओळखला जाणारा देशी प्रजातीचा वीर कुत्रा.
घोड्याच्या मागे उभा कुत्रा. २८ सैनिक मारले, अनेकांना जखमी केले. हे ऐकून शिपाईही थरथरले.
बख्तावरसिंग गंभीर जखमी झाले आणि मालकासाठी झुंजणाऱ्या कुत्र्याचं डोकं शत्रूने उडवलं.
बख्तावरसिंग आणि त्याचा कुत्रा रणभूमीतच शहीद झाले. पण औरंगजेबाच्या फौजेला पराभव पत्करावा लागला.
ठाकूर मदनसिंह यांनी रणभूमीत बख्तावरसिंग व कुत्र्याची समाधी बांधली.
ही एक कुत्र्याच्या निष्ठेची आणि वीरतेची कहाणी आहे, जी आजही प्रेरणा देते.