सकाळ वृत्तसेवा
बाबरने 1526 मध्ये पहिल्या युद्धात इब्राहिम लोदीला पराभूत करून मुघल साम्राज्याची सुरुवात केली.
मुघल सम्राटांनी एक केंद्रीकृत प्रशासन विकसित केलं होतं. मनसबदारी आणि जागीर व्यवस्था ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्यं होती.
मुघल काळात कृषी, व्यापार आणि हस्तकलेचा मोठा विकास झाला. शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यासाठी अकबरने टोडरमलच्या सहाय्याने महसूल व्यवस्था सुधारली.
या छायाचित्रातून छत्रपती शिवाजी महाराज मुघल दरबारात गरजताना दिसत आहेत
मुघल काळात भारताने मध्य आशिया, पर्शिया, तुर्कस्तान आणि युरोपातील देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित केले.
मुघल काळातील दिल्लीचा हा दुर्मिळ नकाशा तुम्ही पाहू शकता
काही मुघल सम्राटांनी सहिष्णुता दाखवली, तर औरंगजेबासारख्या शासकांनी धार्मिक कट्टरतेचा अवलंब केल्यामुळे तणाव निर्माण झाला.
मूघलांच्या बेगमांचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे
बाबरपासून औरंगजेबापर्यंत मुघल साम्राज्य बळकट होते, पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (1707) मुघल साम्राज्य झपाट्याने कमकुवत होऊन ब्रिटिश सत्तेचा पाया तयार झाला.
मुघल काळातील दुर्मिळ वास्तूंची ही छायाचित्रे त्या काळाची आठवण करून देतात