Shubham Banubakode
अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा प्रसिद्ध फॉर्म्युला : E=mc² (ऊर्जा = वस्तुमान x प्रकाशाच्या वेगाचा वर्ग). 1905 मध्ये सापेक्षतावादाचा हा विशेष सिद्धांतात मांडण्यात आला होता.
E=mc² ने सिद्ध केलं की थोड्या वस्तुमानातून प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते. यामुळे अणुविखंडन (Nuclear Fission) आधारित अणुबॉम्ब शक्य झाला.
1939 मध्ये आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना पत्र लिहून अणुबॉम्बच्या संशोधनाची शक्यता सुचवली. यातून मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू झाला, ज्याने अणुबॉम्ब विकसित केला.
आइन्स्टाइन यांनी थेट अणुबॉम्ब बनवला नाही, पण त्यांचा सिद्धांत हा अणुबॉम्बच्या निर्मितीचा पाया होता. त्यांनी पत्र लिहिल्यामुळे संशोधनाला गती मिळाली होती.
1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा (6 ऑगस्ट) आणि नागासाकी (9 ऑगस्ट) येथे अणुबॉम्ब टाकले. यात लाखो लोक मृत्यूमुखी पडले. प्रचंड विनाश झाला.
अणुबॉम्बच्या विनाशकारी परिणामांमुळे आइन्स्टाइनला खूप पश्चाताप झाला. त्यांनी म्हटलं, “मी ते पत्र लिहिलं नसतं तर बरं झालं असतं.”
युद्धानंतर आइन्स्टाइन यांनी अणुशस्त्रविरोधी मोहिमांना पाठिंबा दिला. त्यांनी रसेल-आइन्स्टाइन मॅनिफेस्टोमध्ये अणुयुद्धाचा धोका अधोरेखित केला.
E=mc² हा सिद्धांत वैज्ञानिक प्रगतीसाठी होता, पण त्याचा गैरवापर झाला. आइन्स्टाइन यांना विज्ञानाच्या दुरुपयोगाची चिंता सतावत होती.
अणुबॉम्बमुळे शीतयुद्ध आणि अण्वस्त्र शर्यत सुरू झाली. आइन्स्टाइन यांनी अणुशस्त्र नियंत्रणासाठी जागतिक करारांचे समर्थन केले.
आइन्स्टाइन यांचा सिद्धांत आजही ऊर्जा आणि विज्ञान क्षेत्रात क्रांतीकारी आहे. त्यांचा पश्चाताप आपल्याला विज्ञानाच्या जबाबदार वापराची शिकवण देतो.