Shubham Banubakode
घंटी वाजवण्याची प्रथेला धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की, घंटीचा आवाज देवाला जागृत करतो आणि भक्तांच्या प्रार्थनांकडे त्याचे लक्ष वेधले जाते.
जेव्हा घंटी वाजवली जाते, तेव्हा तिचा आवाज वातावरणात कंपन निर्माण करतो. ज्यामुळे वातावरणात वेगळीच ऊर्जा संचारते.
घंटीच्या आवाजामुळे शरीरातील इंद्रियांना चालना मिळते. यामुळे मेंदू सकारात्मक परिणाम होतो. तसेच मन शांत होते.
घंटीचा मधुर आवाज डोक्यातील नकारात्मक विचारांना दूर करतो. यामुळे भक्त स्वच्छ आणि शांत मनाने मंदिरात प्रवेश करतो.
घंटीचा आवाज मनाला एकाग्र करण्यास मदत करते. यामुळे भक्त अधिक लक्ष केंद्रित करून प्रार्थना आणि भक्ती करू शकतो.
घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात. यामुळे मंदिराचे वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते.
ज्या ठिकाणी नियमितपणे घंटीचा आवाज घुमतो, तिथले वातावरण पवित्र राहते. यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा कायम राहते.