Sandip Kapde
इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल असून तो ऊस, मका, तांदूळ आणि इतर स्टार्चयुक्त पिकांपासून तयार केला जाणारा जैव-इंधन आहे.
How Ethanol Is Produced
esakal
इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस, गूळ, मळी, मका, ज्वारी आणि सडलेले तांदूळ यांसारख्या कच्च्या मालाचा वापर केला जातो.
How Ethanol Is Produced
esakal
धान्य किंवा ऊस प्रक्रिया करून त्यातील साखर किंवा स्टार्च वेगळा काढून इथेनॉल निर्मितीसाठी मिश्रण तयार केले जाते.
How Ethanol Is Produced
esakal
तयार झालेल्या मिश्रणात आवश्यक प्रमाणात पाणी आणि यीस्ट मिसळून किण्वन प्रक्रिया सुरू केली जाते.
How Ethanol Is Produced
esakal
यीस्ट साखरेचे रूपांतर इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये करत असल्याने अल्कोहोल तयार होण्यास सुरुवात होते.
How Ethanol Is Produced
esakal
किण्वन प्रक्रिया साधारणपणे काही दिवस चालते आणि त्यानंतर अल्कोहोलयुक्त मिश्रण तयार होते.
How Ethanol Is Produced
esakal
किण्वनानंतर मिळालेल्या मिश्रणातील इथेनॉल वेगळा करण्यासाठी डिस्टिलेशन कॉलममध्ये आसवन प्रक्रिया केली जाते.
How Ethanol Is Produced
esakal
आसवनामुळे अल्कोहोल आणि पाणी वेगळे होऊन इथेनॉल अधिक शुद्ध स्वरूपात मिळतो.
How Ethanol Is Produced
esakal
इथेनॉलमधील उरलेले पाणी विशेष रासायनिक प्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते.
How Ethanol Is Produced
esakal
निर्जलीकरणानंतर ९९ टक्क्यांहून अधिक शुद्ध इथेनॉल तयार होतो, जो इंधनासाठी उपयुक्त असतो.
How Ethanol Is Produced
esakal
इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलमध्ये पेट्रोल किंवा इतर रसायने मिसळून तो पिण्यायोग्य राहणार नाही याची काळजी घेतली जाते.
How Ethanol Is Produced
esakal
तयार झालेला इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वाहनांसाठी पर्यावरणपूरक जैव-इंधन म्हणून वापरला जातो.
How Ethanol Is Produced
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj House
esakal