बिबट्याला माणसाचा वास किती अंतरावरुन येतो?

संतोष कानडे

बिबट्या

बिबट्याची वास घेण्याची क्षमता माणसाच्या तुलनेत अत्यंत तीक्ष्ण आणि संवेदनशील असतात.

वास

सामान्यतः अनुकूल वाऱ्याच्या दिशेने बिबट्या माणसाचा वास २०० ते ३०० मीटर अंतरावरून सहज ओळखू शकतो.

वारा

जर वारा जोराचा आणि थेट माणसाकडून बिबट्याच्या दिशेने वाहत असेल, तर तो तब्बल ४०० ते ५०० मीटर अंतरावरूनही माणसाची उपस्थिती ओळखतो.

नाक

बिबट्याच्या नाक आणि टाळूच्या भागात 'जेकब्सन्स ऑर्गन' नावाचा अवयव असतो, जो सूक्ष्म गंधाचे रेणू अचूक टिपण्यास मदत करतो.

तंबाखू

मानवी शरीराचा घाम, कपडे, साबण, तेल किंवा तंबाखू यांसारखे तीव्र वास बिबट्या नैसर्गिक जंगलात खूप लांबूनच ओळखतो.

मीटर

वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास म्हणजे बिबट्याकडून माणसाकडे वारा वाहत असल्यास वास मिळण्याचे अंतर ५० ते १०० मीटरपर्यंत कमी होऊ शकते.

दाट झाडी

हवेतील आर्द्रता, दाट झाडी आणि धुके यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे गंध हवेत जास्त वेळ टिकून राहतो, ज्यामुळे बिबट्याला वास घेणे अधिक सोपे जाते.

दबा धरून

वासाच्या जोरावर माणसाची चाहूल लागताच बिबट्या सहसा थेट समोर न येता शांतपणे दबा धरून बसतो किंवा आपला रस्ता बदलतो.

संरक्षण

बिबट्या शिकारीसाठी प्रामुख्याने दृष्टी आणि ऐकण्याच्या क्षमतेवर जास्त अवलंबून असला, तरी स्वतःच्या संरक्षणासाठी तो वासाचा सर्वाधिक वापर करतो.

संघर्ष

बिबट्या माणसाला लांबूनच वासावरून ओळखत असल्याने बहुतांश वेळी तो मानवाशी समोरासमोर संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतो.

मुघलांच्या मद्यधुंद पार्ट्यांचे किस्से...

<strong>येथे क्लिक करा</strong>