प्रशांत महासागराचा शोध कसा लागला?

Shubham Banubakode

नवा समुद्री मार्ग

अमेरिकेचा शोध लागल्यानंतरही व्यापारी अटलांटिक आणि हिंद महासागरातून प्रवास करत होते. मॅगेलनला मात्र मसाल्यांच्या बेटांपर्यंत नवा मार्ग शोधायचा होता.

Pacific Ocean discovery

|

esakal

स्पेनमधून सुरुवात

२० सप्टेंबर १५१९ रोजी फर्डिनेंड मॅगेलन पाच जहाजं आणि २७० सहकाऱ्यांसह इंडोनेशियातील मसाल्यांच्या बेटांच्या शोधात निघाला.

Pacific Ocean discovery

|

esakal

दक्षिण अमेरिकेचा किनारा

पश्चिम आफ्रिका आणि ब्राझीलचा प्रवास केल्यानंतर मॅगेलनचा ताफा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचला. तिथे त्यांनी समुद्रमार्ग शोधण्यास सुरुवात केली.

Pacific Ocean discovery

|

esakal

मॅगेलनविरोधात बंड

पोर्ट सेंट ज्युलियन येथे मुक्काम असताना स्पॅनिश कप्तानांनी मॅगेलनविरोधात बंड पुकारलं. मात्र, त्याने बंड मोडून काढत प्रवास सुरू ठेवला.

Pacific Ocean discovery

|

esakal

सापडली समुद्रधुनी

२१ ऑक्टोबर १५२० रोजी मॅगेलनला अपेक्षित असलेली समुद्रधुनी सापडली. दक्षिण अमेरिकेच्या टोकाजवळ असलेल्या या मार्गाला पुढे मॅगेलन स्ट्रेट नाव मिळालं.

Pacific Ocean discovery

|

esakal

प्रवासात गमावली जहाजं

या समुद्रधुनीतून प्रवास करणं सोपं नव्हतं. मॅगेलनच्या ताफ्यातील काही जहाजं प्रवासातून बाहेर पडली आणि त्यांची संख्या कमी झाली.

Pacific Ocean discovery

|

esakal

धोकादायक प्रवास

मॅगेलनच्या ताफ्याला ही समुद्रधुनी पार करण्यासाठी तब्बल ३८ दिवस लागले. अखेर दुसऱ्या बाजूला विशाल समुद्र दिसताच त्याला आनंद झाला.

Pacific Ocean discovery

|

esakal

प्रशांत महासागराचा शोध

२८ नोव्हेंबर १५२० रोजी मॅगेलन प्रशांत महासागरात पोहोचला. समुद्र शांत असल्याने त्याने या महासागराला पॅसिफिक म्हणजेच शांत समुद्र असं नाव दिलं.

Pacific Ocean discovery

|

esakal

घराच्या छतावर पाण्याची टाकी नेमकी कुठे ठेवावी?

water tank placement on roof

|

esakal

हेही वाचा -