सकाळ डिजिटल टीम
निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करणे असो, त्वचा चमकदार करणे असो किंवा योग्य पचनक्रिया राखणे असो या सर्वांसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे.
पण झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का? ते फायदेशीर आहे की हानिकारक? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तज्ञांच्या मते, तुम्ही झोपण्यापूर्वी नक्कीच पाणी पिऊ शकता; पण केवळ झोपण्यापूर्वीच नाही.
जेवणानंतर सुमारे एक तास आणि झोपण्यापूर्वी दोन तास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.
झोपण्यापूर्वी पाणी पिल्याने तुमची पचनक्रियाही बिघडू शकते.
जर तुम्ही झोपण्यापूर्वी पाणी प्यायले, तर तुम्हाला कमी झोपेची तक्रार येऊ शकते.
झोपण्यापूर्वी पाणी पिल्याने रात्री वारंवार लघवी होऊ शकते. यामुळे नॉक्टुरियाचा धोका वाढू शकतो.