Aarti Badade
रशियात हिंदू धर्म १६व्या शतकात पोहोचला. हा इतिहास अनेक शतकांचा आहे.
सन १५५६ मध्ये दक्षिण रशियामधील अस्त्राखान येथे भारतीय हिंदू समुदाय रशियन साम्राज्याचा भाग बनला.
१७व्या शतकात सम्राट पीटर द ग्रेट यांनी अस्त्राखानच्या हिंदू नेत्याला भेट दिली. त्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण करणारा कायदा लागू केला.
रशियामधील परदेशी धर्माचे संरक्षण करणारा हा पहिला कायदा होता.
१८व्या शतकात प्रशियन प्रवासी पॅलासने नोंद केली. व्होल्गा नदीच्या मुखाशी मलताणी वैष्णव व्यापारी कुटुंबे होती.
या वैष्णव समुदायामुळे रशियात भक्ती परंपरेचा प्रभाव वाढला.
१९७१ मध्ये ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉनचा रशियात प्रचार सुरू केला.
१९८८ मध्ये रशियात इस्कॉन अधिकृत धर्मसंघ म्हणून नोंदवले गेले. १९९८ मध्ये पुन्हा नोंदणी झाली.
१९९८ पर्यंत रशियात १२० पेक्षा जास्त कृष्ण भक्त समुदाय होते.
आज रशियात हिंदू धर्म धार्मिक सहनशीलतेचे आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे.