पुजा बोनकिले
कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा ह्युमन मेटान्युमो व्हायरसने थैमान घातले आहे
या व्हायरसचा धोका लहान मुलांना जास्त का आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
तज्ज्ञांच्या मते या विषाणूची लागण ५ वर्षांपेक्षा लहान मुलांना होऊ शकते
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.
त्यामुळे त्यांना कोणत्याही विषाणूची लागण होऊ शकते.
एचएमपीव्ही हा श्वसनासंबंधित विषाणू असल्याने, तो मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो आणि त्यांना सहजपणे लागण होऊ शकते.
मुलांना वारंवार हात स्वच्छ धुण्याचा सल्ला द्यावा.
मुलांना हँडशेक करू देऊ नका.
मुलांना डोळे, नाक आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू देऊ नका.