सकाळ डिजिटल टीम
पुर्वीच्या काळी दूरवरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी कबुतरांद्वारे पत्र पाठवली जायची पण या कबुतरांना पत्ता कसा कळतो? जाणून घ्या.
Pigeons
sakal
कबुतरांना पत्ता कळत नाही, तर त्यांना फक्त त्यांच्या घराचा (घरट्याचा) रस्ता कळतो. संदेशवहनासाठी वापरली जाणारी कबुतरे विशिष्ट ठिकाणाहून सोडून दिली की ती आपल्या मूळ घरी परत येतात.
Pigeons
sakal
कबुतरांच्या चोचीमध्ये लोहयुक्त पेशींचे (Magnetite) एक नैसर्गिक होकायंत्र असते. यामुळे त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची (Magnetic Field) जाणीव होते आणि ते आपली दिशा ठरवतात.
Pigeons
sakal
दिवसा प्रवास करताना कबुतर सूर्याच्या स्थितीचा वापर दिशा ठरवण्यासाठी करतात. त्यांच्याकडे एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते, ज्याद्वारे ते वेळेनुसार सूर्याच्या बदलत्या दिशेचा अंदाज घेतात.
Pigeons
sakal
कबुतरं ज्या भागातून उडतात, तिथल्या डोंगरांच्या रांगा, नद्या किंवा मोठ्या खुणा लक्षात ठेवतात. या व्हिज्युअल लँडमार्कमुळे त्यांना घराचा मार्ग सापडतो.
Pigeons
sakal
काही संशोधनानुसार, कबुतरांना विशिष्ट वासावरूनही दिशा कळते. वारे ज्या दिशेने वाहतात, त्यावरून ते आपल्या घरट्याच्या परिसरातील परिचयाचा वास ओळखतात.
Pigeons
sakal
कबुतर फक्त संदेश घेऊन 'परत' येऊ शकतात. त्यामुळे जर 'अ' ठिकाणाहून 'ब' ठिकाणी संदेश पाठवायचा असेल, तर 'ब' ठिकाणचे कबुतर आधी 'अ' ठिकाणी पिंजऱ्यातून नेले जाई. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला पत्रासह सोडून दिले जाई.
Pigeons
sakal
निरोपवाहक कबुतरे ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने उडू शकतात आणि एका दिवसात साधारण ८०० ते १००० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात.
Pigeons
sakal
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कबुतरांनी महत्त्वाचे लष्करी संदेश पोहोचवले होते. कित्येक कबुतरांनी जखमी असतानाही संदेश पोहोचवून हजारो सैनिकांचे प्राण वाचवले आहेत, त्यासाठी त्यांना पदकेही देण्यात आली आहेत.
Pigeons
sakal