सकाळ डिजिटल टीम
बदलत्या ऋतूत त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे, आणि इतर समस्या होतात.
चेहऱ्यावर बर्फ लावल्याने तुम्हाला निखारदार आणि चमकदार त्वचा मिळते. यामुळे पिंपल्स आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो.
फेस आयसिंग म्हणजेच चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने त्वचेला एक अप्रतिम ग्लो मिळतो. यामुळे त्वचा निरोगी आणि ताजीतवानी दिसते.
बर्फाने फेशियल केल्याने मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. त्वचेची सूज कमी होते आणि छिद्रांचे आकार लहान होतात.
चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात. नियमित फेस आयसिंगमुळे सूजही कमी होते.
बर्फ हा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. दुधाच्या बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास मृत त्वचा काढली जाते आणि त्वचा ताजेतवानी दिसते.
बर्फासोबत दूध आणि इतर नैसर्गिक घटक वापरून तुम्ही घरातच फेशियल करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे नुतनीकरण होईल.