Anushka Tapshalkar
कधी विचार केला आहे का, ट्रेनमध्ये लांबचा प्रवास आणि टॉयलेटच नसेल तर?
1853 मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली, पण सुरुवातीला सामान्य डब्यांमध्ये टॉयलेट नव्हते!
1909 मध्ये सेन यांच्यासोबत घडलेल्या घटनेने भारतीय रेल्वेत टॉयलेटची सुरुवात झाली.
प्रवासात सेन यांना शौचासाठी उतरावे लागले. तेवढ्यात ट्रेनने शिट्टी वाजवली आणि निघून गेली!
ट्रेन पकडताना सेन पडले, अपमानित झाले आणि ट्रेनही चुकली.
सेन यांनी घटनेचे वर्णन करून धमकी दिली – “ही घटना वृत्तपत्रात प्रसिद्ध करीन!”
रेल्वेने चौकशी केली आणि सेन यांची तक्रार खरी असल्याचे मान्य केले.
80 किमीहून अधिक अंतर कापणाऱ्या गाड्यांच्या जनरल कोचमध्ये टॉयलेट बसवले गेले.
सुरुवातीला मल थेट रुळांवर पडत असे. नंतर फ्लशिंग सिस्टीम, आणि आता बायो-टॉयलेट्स!
प्रवाशांच्या सुखासाठी लढलेला एक सामान्य माणूस आज रेल्वेत टॉयलेट आहे, ते त्यांच्यामुळे!