Anushka Tapshalkar
उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील माधौपट्टी हे गाव UPSC पास होणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हा काही योगायोग नाही, तर ही एक जिवंत परंपरा आहे.
या गावात केवळ 75 घरं आहेत आणि त्यामधून तब्बल 45 IPS अधिकारी झाले आहेत. इतकंच नव्हे, उरलेल्या घरांमधून अनेक IAS, IRS आणि IFS अधिकारीही झाले आहेत.
गावातील मुस्तफा हुसैन यांनी 1914 साली प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मात्र UPSC परंपरेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 1952 साली.
1952 साली इंदूप्रकाश यांनी UPSC परीक्षेत देशात 13वा रॅन्क मिळवला. त्यांच्या यशानंतर UPSC हे गावाचं स्वप्न बनलं.
होय, एका कुटुंबातील चार सख्ख्या भावांनी एकाच वर्षी IAS परीक्षा उत्तीर्ण केली. या ऐतिहासिक घटनेमुळे गावात UPSC विषयी मोठा उत्साह निर्माण झाला.
या गावातील जवळपास प्रत्येक घरातून कोणी ना कोणी UPSC परीक्षा पास करत आहे.
UPSC उत्तीर्ण होणं म्हणजे या गावासाठी एक परंपरा बनली आहे.
या गावातील महिला देखील UPSC मध्ये मागे नाहीत. आशा सिंह, उषा सिंह आणि चंद्रमौली सिंह यांसारख्या महिलांनी प्रशासकीय सेवांमध्ये विशेष कामगिरी बजावली आहे
अन्जमेय सिंह हे मनिलामधील जागतिक बँकेत कार्यरत आहेत. डॉ. नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप BARC मध्ये काम करतात. ज्ञानू मिश्रा हे इस्रोमध्ये कार्यरत आहेत. या सर्वांनी गावाच्या सीमा ओलांडून देश-विदेशात नाव कमावलं आहे.
प्रशासकीय सेवा मिळवूनही हे अधिकारी आपलं गाव विसरत नाहीत. त्यांची घरं अजूनही माधौपट्टीतच आहेत आणि ते दरवर्षी गावाला भेट देतात.
माधौपट्टी हे फक्त एक गाव नाही, तर UPSC परीक्षेसाठी प्रेरणास्थान आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि सामूहिक प्रेरणेचं हे एक अफाट उदाहरण आहे.
ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना मिळतं का वेगळं अलाउन्स?