Shubham Banubakode
AQI म्हणजे हवेची गुणवत्ता मोजण्याचा निर्देशांक. याच्या मदतीने हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे, हे एका आकड्यात समजतं.
Air Quality Index
esakal
AQI मोजताना PM2.5, PM10, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड यांसह आठ प्रदूषकांचं प्रमाण तपासलं जातं.
Air Quality Index
esakal
शहरातील वेगवेगळ्या निरीक्षण केंद्रांवर खास उपकरणं बसवलेली असतात. त्यांच्या मदतीने हवेतल्या प्रदूषकांचं प्रमाण मोजलं जातं.
Air Quality Index
esakal
हवेतल्या प्रत्येक प्रदूषकासाठी स्वतंत्र सब-इंडेक्स काढला जातो. त्यासाठी मोजलेलं प्रमाण आणि ठरवलेल्या मर्यादा विचारात घेतल्या जातात.
Air Quality Index
esakal
AQI मोजण्यासाठी काही प्रदूषकांची २४ तासांची, तर काहींची आठ तासांची सरासरी घेतली जाते. किमान १६ तासांची माहिती आवश्यक असते.
Air Quality Index
esakal
सर्व प्रदूषकांचे स्वतंत्र आकडे काढल्यानंतर त्यांची तुलना होते. यापैकी सर्वाधिक सब-इंडेक्स असलेला आकडा अंतिम AQI ठरतो.
Air Quality Index
esakal
हवेची गुणवत्ता सहा गटांत विभागली जाते. ० ते ५० चांगली, तर ४०१ ते ५०० गंभीर प्रदूषणाची पातळी दर्शवते.
Air Quality Index
esakal
AQI काढण्यासाठी किमान तीन प्रदूषकांची माहिती लागते. त्यापैकी एक PM2.5 किंवा PM10 असणं आवश्यक आहे.
Air Quality Index
esakal
Does Wheat Flour Expire
esakal