Aarti Badade
पंढरपूरच्या विठोबा मंदिर परिसरातील, विशेषतः भाविक जिथे रांगेत उभे राहतात त्या ठिकाणची माती संकलित केली जाते. ही माती पवित्र मानली जाते.
संकलित मातीमध्ये चंद्रभागा नदीचे पवित्र जल मिसळले जाते. या पाण्यामुळे माती अधिक शुद्ध व संस्कारी होते.
चंद्रभागा जलमिश्रित मातीमध्ये सुगंधी अबीर टाकला जातो. यामुळे टिळ्याला सुंदर गंध येतो व तो शीतल राहतो.
काही ठिकाणी या मिश्रणात चंदनही मिसळले जाते. चंदनामुळे टिळ्याला शीतलता व पवित्रता प्राप्त होते.
वरील सर्व घटक एकत्र करून एक विशिष्ट पद्धतीने टिळा तयार केला जातो, जो दररोज विठ्ठलाच्या कपाळावर लावला जातो.
हा टिळा विठोबाच्या स्वरूपात दिव्यता, तेज आणि आकर्षकता निर्माण करतो, असे भक्तांचे मानणे आहे.
विठ्ठलाच्या कपाळावरील टिळा लावण्याची ही प्रथा अत्यंत प्राचीन असून, आजही ती भक्तिभावाने जपली जाते.