Shubham Banubakode
आपण रोज खाणारा मैदा हा गव्हापासून तयार केला जातो. मात्र, तयार होईपर्यंत गव्हातील अनेक नैसर्गिक घटक वेगळे केले जातात.
How Is Maida Made
esakal
कारखान्यात आलेल्या गव्हाची आधी तपासणी केली जाते. त्यानंतर चाळण्या आणि चुंबकीय यंत्रांच्या मदतीने दगड, माती, धूळ आणि कचरा काढला जातो.
How Is Maida Made
esakal
स्वच्छ केलेल्या गव्हावर पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यानंतर तो साधारण १२ ते १५ तास मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो.
How Is Maida Made
esakal
गव्हाच्या दाण्यात चोकर, जर्म आणि एंडोस्पर्म असे तीन भाग असतात. या तिन्ही भागांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात.
How Is Maida Made
esakal
चोकर हा गव्हाचा बाहेरचा थर असतो. त्यात फायबर असतं, तर जर्ममध्ये जीवनसत्त्वं आणि आरोग्यदायी फॅट्स असतात.
How Is Maida Made
esakal
गव्हातील एंडोस्पर्म हा पांढरा भाग असतो. त्यात प्रामुख्याने स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स असतात. हा भाग मशीनमध्ये बारीक दळला जातो.
How Is Maida Made
esakal
एंडोस्पर्म बारीक दळल्यानंतर त्याची पांढरी पावडर तयार होते. यालाच आपण मैदा म्हणतो. या प्रक्रियेत चोकर आणि जर्म वेगळे होतात.
How Is Maida Made
esakal
मैद्यात फायबर आणि अनेक पोषक घटक कमी असतात. त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखर आणि वजन वाढण्याचा धोका असू शकतो.
How Is Maida Made
esakal
How Many Times Does a Person Breathe
esakal