Anushka Tapshalkar
साबुदाणा भारतात खासकरून उपवासासाठी बनवण्यात येणाऱ्या विविध पदार्थांमध्ये वापरण्यात येणार मुख्य घटक आहे.
हा साबुदाणा बाजारात येण्यापूर्वी एका प्रक्रियेतून जातो, त्याबद्दल पुढे जाणून घेऊया.
टापिओका किंवा कसावा वनस्पतीची कंदमुळे गोळा करून स्वच्छ धुऊन त्यातील माती आणि अशुद्धी काढली जाते.
कंदमुळाचे बारीक तुकडे करून त्यामधून स्टार्च काढले जातात. ते पाण्यात विरघळून काही काळ तसेच ठेवले जातात, ज्यामुळे ते घट्ट होतात आणि नंतर गाळून वाळवले जातात.
सुकवलेल्या स्टार्चला लहान गोळ्यांच्या आकारात रूपांतरित करण्यासाठी मशीनचा वापर केला जातो आणि नंतर हे छोटे दाणे गरम पाण्याने किंवा वाफेने किंचित शिजवले जातात, ज्यामुळे ते थोडेसे पारदर्शक होतात.
तयार झालेले दाणे उन्हात किंवा मशीनमध्ये वाळवले जातात आणि त्यांना एकसंध, गुळगुळीत व चमकदार बनवण्यासाठी पॉलिश केले जाते.
पूर्णपणे वाळल्यावर, साबुदाणा पॅक करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जातो.