Aarti Badade
कॅन्सर म्हणजे केवळ शरीरावरील गाठ नसून, ती आपल्या शरीरातील सर्वात सूक्ष्म घटक असलेल्या 'पेशी'पासून (Cell) सुरू होणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
cancer spreads in body
Sakal
शरीरातील पेशींच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'डीएनए' कोडमध्ये जेव्हा बिघाड (Mutation) होतो, तेव्हा कॅन्सरची पहिली ठिणगी पडते.
cancer spreads in body
Sakal
नैसर्गिक चक्रानुसार जुन्या पेशींनी मरून तिथे नवीन पेशी येणे गरजेचे असते, पण डीएनए बिघडल्यामुळे खराब झालेल्या पेशी मरायचे विसरतात.
cancer spreads in body
Sakal
खराब झालेली पेशी मरण्याऐवजी स्वतःच्या हजारो प्रतिलिपी तयार करते. या असामान्य पेशी एकाच ठिकाणी जमा होऊन 'गाठ' म्हणजेच 'ट्यूमर' तयार होतो.
cancer spreads in body
Sakal
'बिनाइन' गाठी एकाच जागी राहतात, पण 'मॅलिग्नंट' ट्यूमरमधील पेशी शेजारील अवयवांवर आक्रमण करून शरीराच्या कामात अडथळा निर्माण करतात.
cancer spreads in body
Sakal
जेव्हा कॅन्सरच्या पेशी रक्तप्रवाह किंवा लसिका संस्थेचा (Lymphatic System) वापर करून शरीराच्या इतर भागांत पोहोचतात, तेव्हा त्याला 'मेटास्टेसिस' म्हणतात.
cancer spreads in body
Sakal
कॅन्सर हे आपल्याच पेशींनी पुकारलेले बंड आहे. सुदृढ आहार, व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहून आपण आपला डीएनए सुरक्षित ठेवू शकतो.
cancer spreads in body
Sakal
Dizziness due to sun remedies
Sakal