आंदोलनकर्त्या नेत्यांना किती वेळ ताब्यात ठेवले जाते? याबाबतचे नियम तुम्हाला माहितीयेत का?

Mansi Khambe

खासदारांचा मोर्चा

बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा आणि कथित मतचोरीच्या विरोधात विरोधी इंडिया अलायन्स गठबंधनातील घटक पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला.

Political leaders protest | ESakal

अनेक विरोधी नेते ताब्यात

यादरम्यान, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खासदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

Political leaders protest | ESakal

नेत्यांना कधी सोडतात?

मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, या निषेध करणाऱ्या नेत्यांना किती काळ ताब्यात ठेवले जाते आणि त्याबाबतचे नियम काय आहेत? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.

Political leaders protest | ESakal

नियम काय?

ताब्यात ठेवण्याच्या नियमांबद्दल बोलायचे झाले तर, जर कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेतले असेल तर कोणालाही २४ तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येणार नाही.

Political leaders protest | ESakal

दंडाधिकारी

जर एखाद्याला २४ तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवले असेल तर पोलिसांनी त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागते, त्यानंतर त्याला अटक केली जाते.

Political leaders protest | ESakal

सुरक्षा

जर आपण नेत्यांबद्दल बोललो तर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेतले जाते. परंतु परिस्थिती शांत झाल्यानंतर त्यांना सोडले जाते.

Political leaders protest | ESakal

२४ तासांचा काळ

नेता असो किंवा सामान्य माणूस, कोणालाही २४ तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेत्यांना ताब्यात घेतले जाते.

Political leaders protest | ESakal

कायदेशीर तरतुदी

आज देखील तेच करण्यात आले आहे. परिस्थिती शांत झाल्यावर त्या नेत्यांना सोडण्यात येईल. अटकेचे नियम अटक आणि ताब्यात घेण्याशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा संदर्भ देतात.

Political leaders protest | ESakal

१५ दिवसांपर्यंत रिमांड

गंभीर प्रकरणांमध्ये, पोलीस १५ दिवसांपर्यंत रिमांड घेऊ शकतात. जो नंतर वाढवता येतो. ताब्यात असलेल्या व्यक्तीला योग्य सुविधा आणि सुरक्षा दिली जाते.

Political leaders protest | ESakal

वकिलाला भेटण्याचा अधिकार

अटकेत असलेल्या व्यक्तीला त्याच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार आहे. अटकेनंतर ४८ तासांच्या आत, दंडाधिकाऱ्याने संभाव्य कारण आहे की नाही हे ठरवावे लागते. अन्यथा त्या व्यक्तीला सोडावे लागते.

Political leaders protest | ESakal

भारतीय रेल्वेमध्ये किती प्रकारचे ट्रॅक आहेत? दोन ट्रॅकमध्ये अंतर किती असते? वाचा...

Railway Track | ESakal
येथे क्लिक करा