संतोष कानडे
वाघ तासन्तास पाण्यात पोहू शकतो, त्याला जलक्रिडेचा बादशहा म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गरम हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी तो पाण्यात पडून राहाणं किंवा पोहणं पसंत करतो.
वाघ एका दमात ७ ते १५ किलोमीटरपर्यंत पोहू शकतो. सुंदरबनसारख्या भागात तर वाघ एका बेटावरून दुसऱ्या बेटावर सहज पोहत जातात.
पोहण्यासाठी वाघ आपल्या शक्तिशाली पायांचा वापर करतात. ते कुत्र्याप्रमाणे पाय हलवून स्वतःला पाण्यात पुढे ढकलतात आणि पोहतात.
वाघाच्या पायांचे स्नायू अत्यंत मजबूत असतात आणि त्याचे पंजे रुंद असतात, त्याचा उपयोग पाण्यात वल्ह्यासारखे करता येतो.
वाघ फक्त पोहत नाही तर तो पाण्यात शिकारही करतो. पाण्यातून शांतपणे सरकत जाऊन तो काठावरील प्राण्यावर अचानक हल्ला करतो.
वाघाचा अनेकदा पाण्यामध्ये मगरींशी संघर्ष होतो. पाण्यावर पूर्ण नियंत्रण असल्याने तो मगरीला ओढून जमिनीवरही आणू शकतो.
वाघीण आपल्या पिल्लांना लहानपणापासूनच पोहण्याचे शिक्षण देत असते. त्यामुळे वाघांना जन्मतःच पाण्याची भीती वाटत नाही.
विशेष म्हणजे वाघ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेसुद्धा अत्यंत वेगाने पोहू शकतो. त्यामुळे वाघाला जलचर शिकारी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.