सिंह कळपात आणि वाघ एकटा का रहातो?

संतोष कानडे

जंगल

जंगली प्राण्यांचं आयुष्य हे फारच रहस्यमय असतं. काही प्राणी कळपाने राहतात तर काही स्वतंत्र एकटे.

वाघ

वाघ हा एकट्याने रहातो तर सिंह हा कळपाने रहतो. सिंहाची फॅमिली मोठी असतो. वृद्ध, तरुण आणि लहान सिंह एकत्र रहातात.

शिकार

वाघ हा दबा धरून शिकार करणारा प्राणी आहे. दाट झाडीत स्वतःला लपवून शिकार करण्यासाठी एकटं रहाणं त्याला सोयीचं असतं.

सिंह

वाघ घनदाट जंगलात राहतात तर सिंह हे खुल्या मैदानात राहतात. कळपात राहणे वाघांसाठी अडचणीचे असते.

कळप

जंगलामध्ये शिकारींची संख्या मर्यादित असते. वाघांनी जर कळप केले असते तर त्यांना उपाशी रहावं लागलं असतं.

हस्तक्षेप

सिंह हा तसा सामाजिक प्राणी असून वाघ हा एकांतप्रिय असतो. वाघाला स्वतःच्या आयुष्यात कुणाचाही हस्तक्षेप आवडत नाही.

हद्द

वाघ स्वतःची हद्द निश्चित करुन रहात असतात. त्यांना स्वतःच्या टेरिटरीमध्ये कुणीही शिकारी प्राणी आलेलं खपत नाही.

नर

नर आणि मादी वाघीण हे केवळ मिलनाच्या काळामध्ये एकत्र येतात. त्यानंतर ते पुन्हा आपापल्या हद्दीत निघून जातात.

सिंह मात्र कळपाने, मोठी फॅमिली पाळून रहातात. त्यामुळे वाघ आणि सिंह त्यांच्यात संघर्ष होत नाही. झाला तर वाघाचं नुकसान होतं.

संघर्ष

मात्र एकट्याने वाघ-सिंह लढायला लागले तर वाघ कधीही जिंकू शकतो. पण तसं होत नाही. कारण सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबत रहातो.

बेडकाच्या आतड्यात सापडलं कॅन्सरवरील औषध

<strong>येथे क्लिक करा</strong>