Aarti Badade
उकडलेल्या अंड्यांची साठवणूक चुकीच्या पद्धतीने केल्यास त्यात 'साल्मोनेला' सारखे घातक बॅक्टेरिया वाढून ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
Boiled egg shelf life
Sakal
जर तुम्ही अंडी न सोलता फ्रीजमध्ये योग्य तापमानाला ठेवली, तर ती सात दिवसांपर्यंत खाण्यायोग्य राहू शकतात.
Boiled egg shelf life
Sakal
सोललेली अंडी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ओल्या पेपर नॅपकिनसह ठेवावीत आणि जास्तीत जास्त पाच दिवसांच्या आत ती खाऊन संपवावीत.
Boiled egg shelf life
Sakal
उकडलेली अंडी कधीही खोलीच्या तापमानाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नका, अन्यथा ती खराब होऊ शकतात.
Boiled egg shelf life
Sakal
जर अंडी सोलल्यावर त्यातून कुबट किंवा गंधकाचा तीव्र वास येत असेल, तर अशी अंडी न खाता त्वरित फेकून द्यावीत.
Boiled egg shelf life
Sakal
पिवळ्या बलकाभोवती दिसणारे राखाडी-हिरवट वर्तुळ हे 'ओव्हरकुकिंग'मुळे होते आणि अशी अंडी खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात.
Boiled egg shelf life
Sakal
अंडी उकडल्यानंतर ती ताजी ठेवण्यासाठी लगेच बर्फाच्या पाण्यात टाका आणि डब्यावर उकडल्याची तारीख लिहायला विसरू नका.
Boiled egg shelf life
Sakal
भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे अंडी उकडल्यानंतर शक्य तितक्या लवकर ती फ्रीजमध्ये ठेवावीत, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या बाबतीत काळजी घ्यावी.
Boiled egg shelf life
Sakal
Weight gain reasons
Sakal