सकाळ वृत्तसेवा
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल ९ महिने अंतराळात अडकले होते. आता ते पृथ्वीवर परत आले आहेत.
५ जून २०२४ रोजी सुनीता आणि बुच अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र, स्टारलाइनरमधील बिघाडामुळे त्यांना ९ महिने तिथे थांबावे लागले.
अंतराळ स्थानक २८,१६३ किमी प्रतितास वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. त्यामुळे तेथे २४ तासांत १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. अंतराळात ९० मिनिटांत दिवस संपतो.
सुनीता आणि बुच यांचे यान अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्यावर पाण्यात उतरले, त्यासाठी १७ तास लागले.
अंतराळ स्थानकात हायड्रोजन वेगळा करून ऑक्सिजन तयार केला जातो. तसेच, पाणी रिसायकल करून वापरले जाते.
अंतराळ स्थानकात फक्त पॅक फूड असते. त्यांना गरम करून खावे लागते. पाणी रिसायकल करून वापरण्यात येते.
४.५ लाख किलो वजनाच्या या स्थानकात जास्त वस्तू ठेवता येत नाहीत. येथे नियमित प्रयोग आणि देखभालीचे काम केले जाते.
अंतराळात हाडांची आणि स्नायूंची ताकद कमी होते, त्यामुळे तिथे नियमित व्यायाम केला जातो.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग १९९८ मध्ये रशियाच्या झारिया मॉड्यूलच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आला.