पुजा बोनकिले
दात आणि हिरड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ब्रशिंग अत्यंत आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, रोज दोन वेळा, प्रत्येकी २ मिनिटे ब्रश करावे.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे दातांचे किटाणूपासून संरक्षण करते.
दातांच्या सर्व बाजूंना गोलाकार फिरवून हलक्या हाताने ब्रश करा.
मऊ आणि लवचिक ब्रिस्टल्स असलेला टूथब्रश वापरा, जेणेकरून हिरड्यांना इजा होणार नाही.
फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरल्याने दातांचे कवच मजबूत होते.
ब्रशिंगनंतर जिभेवर टंग क्लिनर वापरून किटाणू दूर करा.
दर ३-४ महिन्यांनी किंवा ब्रिस्टल्स खराब झाल्यावर टूथब्रश बदला.
खूप जोरात किंवा जास्त वेळ ब्रश केल्याने हिरड्यांना नुकसान होऊ शकते.