पालकाची पातळ भाजी, ट्राय करा सोपी रेसिपी

Pranali Kodre

पालकाची गरगटी भाजी

पालकची रस्सा भाजी (गरगटी भाजी) बनवणं एकदम सोपं आणि पौष्टिक देखील आहे.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

कशी बनवायची?

पालकाच्या गरगटी भाजी कशी बनवायची जाणून घेऊ.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

साहित्य

पालकाची जुडी, २-३ चमचे हरबरा किंवा मुग डाळ, बेसन, लसून, हिरवी मिरची (आवडीनुसार), हिंग, हळद, तेल, मीठ, पाणी.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

चिरुन घेऊन शिजवा

पालक धूतल्यानंतर निवडून बारीक चिरून घ्या. ही चिरलेली पालक आणि चणा किंवा मुग डाळ थोडं पाणी टाकून कुकरमध्ये किंवा कढईत शिजवून घ्या.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

मिरची-लसानीची पेस्ट

हिरवी मिरची आणि लसनाची बारीक पेस्ट करा, ही पेस्ट शिजलेल्या पालकात टाका आणि मग थोडी भाजी थंड झाल्यानंतर रवीने व्यवस्थित घोटून घ्या.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

फोडणी

त्यानंतर कढईत तेल टाकून त्यात लसून ठेचून टाका. त्यात गरजेनुसार थोडी हळद, मीठ आणि हिंग घाला. या फोडणीत नंतर घोटलेला पालक टाका.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

बेसनाचं पाणी

तसेच एका लहान वाटीत २ चमचे बेसन घेऊन गुठळ्या न होऊ देता कालवून घ्या. हे बेसन फोडणीत टाकलेल्या पालकाच्या भाजीत टाका.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

उकळी येऊ द्या

त्यानंतर भाजीला आवश्यक असेल, तर त्यात थोडं पाणी घालू शकता. भाजीला मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे छान उकळी येऊ द्या.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

घ्या आस्वाद

त्यानंतर ही भाजी भाकरी, भात किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe

|

Sakal

मेथीची रस्सा भाजी खाल्ली का? एकदम सोपी रेसिपी

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

येथे क्लिक करा