सकाळ डिजिटल टीम
एक सामान्य व्यक्ती ४-५ वेळा जेवण करते, ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे नाश्ता आणि रात्रीचे जेवण असते. या पदार्थांसोबत चहा किंवा काही पेयही घेतले जातात.
जेवण जेवतोच पण ते कधी किती खावे हे आवश्यक असणाऱ्या कॅलरीजवर असते हे सविस्तर जाणून घ्या.
झोपताना शरीराच्या पेशींना खूप कमी कॅलोरीची आवश्यकता असते कारण त्यांचे कार्य कमी होते. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेचे पेशी प्रत्येक मिनिटाला सुमारे अर्धा किंवा १ कॅलोरी वापरतात.
बसून काम करत असताना शरीराला अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. जसे की संगणकावर काम किंवा हातांवर दबाव आणणारे काम करत असताना.
स्वयंपाक, दात घासणे, आंघोळ करणे यांसारख्या शारीरिक क्रियांच्या वेळी कॅलोरी प्रति मिनिट २-३ कॅलोरीज आवश्यक असतात.
चालण्यासाठी शरीराला प्रति मिनिट ३-४ कॅलरीज लागतात. वेगाने चालल्यास ५-६ कॅलरीज लागतात, जॉगिंगसाठी ७-९ कॅलोरीज आणि धावण्यासाठी १०-१२ कॅलरीज लागतात.
सामान्य व्यक्तीला दररोज १,६०० कॅलरीची आवश्यकता असते, पण कठोर परिश्रम करणाऱ्या कामगारांना किंवा खेळाडूंना ३००० कॅलरीसारखी अधिक आवश्यकता असू शकते.